बांधकाम कामगारांना गृहपयोगी वस्तू संचाचे मोफत वितरण : सहाय्यक कामगार आयुक्त मुजावर
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई यांच्या अंतर्गत बांधकाम कामगारांना गृहपयोगी वस्तू संच वितरण योजना सुरू करण्यात आली आहे. ही योजना मोफत स्वरूपात असून जीवित नोंदणीकृत बांधकाम कामगारांनी याचा लाभ घ्यावा असे आव्हान सहाय्यक कामगार आयुक्त श्री मुजावर यांनी केले आहे.
सांगली जिल्ह्यातील पात्र बांधकाम कामगारांना मंडळाच्या वतीने गृहपयोगी वस्तू संच मोफत वितरण करण्यात येतो. बांधकाम कामगारांनी कोणतेही एजंट / दलाल व इतर कोणत्याही मध्यस्थी व्यक्तींच्या आमिषाला / भूलथापांना बळी पडू नये अनोळखी व्यक्ती व दलालांच्या बरोबर कोणत्याही प्रकारचे आर्थिक व्यवहार करू नये आर्थिक व्यवहारासंबंधी कामगारांची फसवणूक व दिशाभूल झाल्यास सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय जबाबदार राहणार नाही. संबंधित फसवणूक झालेल्या व्यक्तींनी आपल्या फसवणुकीबाबत पोलीस विभागाकडे रीतसर तक्रार करावी.
सदर शासकीय योजनेचा सांगली जिल्ह्यातील सर्व नोंदणीकृत बांधकाम कामगारांनी लाभ घ्यावा असे आव्हान श्री मुजावर यांनी केले आहे.