मेंढपाळ आर्मीच्या वतीने तासगाव येथे अहिल्यादेवी होळकर जयंती संपन्न —
संपादक : – संतोष एडके
तासगाव येथील धनगर वाडा येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 299 व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सांगली जिल्हा पशुसंवर्धन विभाग आणि मेंढपाळ आर्मीच्या वतीने शेळ्या मेंढ्यांचे पावसाळापूर्व लशी करण कले , व शासनाच्या मेंढपाळांच्या साठी व शेळी मेंढी व्यवसायासाठी असणाऱ्या विविध योजनांची माहिती यावेळी उप आयुक्त सांगली जिल्हा पशुसंवर्धन विभाग डॉ. थोरे साहेब यांनी दिली.

प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन डॉ थोरे साहेब , यांच्या हस्ते व डाॅ गवळी साहेब सहाय्यक उपआयुक्त पशुसंवर्धन विभाग मिरज, तासगाव तासगाव पशु संवर्धन विभागाच्या डॉ चौगुले मॅडम तासगावचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ प्रकाश पाटील यांच्या उपस्थितीत झाले यावेळी डॉक्टर थोरे यांनी शासनाच्या विविध योजना, वेबसाईट, जनावरासाठी येणारे साथीचे रोग त्यासाठी घ्यावयाची काळजी तसेच शेळ्या मेंढ्यांचे विविध आजार त्याची लक्षणे याची माहिती मेंढपाळ बांधवांसाठी दिली . मेंढपाळानी वैयक्तिक किंवा ग्रुप करून पारंपारिक व्यवसायाच्या मागे न राहता आधुनिक पद्धतीने माहिती घेऊन बंदिस्त शेळी , मेंढी पालन केले तर मोठ्या प्रमाणात उद्योजक तयार होऊ शकतात व बेकारी कमी होण्यास मदत होऊ शकते तसेच 45 रुपये लिटर भावाने शेळीचे दूध विकत घेणारे अनेक कंपन्या मार्केटमध्ये आहेत त्यासाठी शेळी मेंढी पालन व्यवसायीकांनी भेट घेतल्यास त्यांचे पत्ते फोन नंबर देण्यात येतील व दुधाला चांगला भाव मिळाल्याने मेंढपाळाच्या हाती रूपये जास्तीत जास्त येतील असेही डॉक्टर थोरे साहेब यांनी सांगितले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्ताने शासनाच्या वतीने ऑनलाईन शेळी मेंढींची नोंदणी करण्याचे काम आज जयंतीच्या निमित्ताने केंद्र शासनाने सुरुवात केली आहे त्याची सुरुवात आज तासगाव येथील कुंडलिक शेंडगे यांच्या बकऱ्याला पहिला टॅग मारून करण्यात आली ही मोहीम संपूर्ण महाराष्ट्रभर राबवली जाणार आहे त्यामुळे मेंढपाळांना त्याचा फायदा होणार असल्याचे सांगितले यावेळी मेंढपाळ आर्मी प्रमुख अर्जुन थोरात म्हणाले की , संपूर्ण महाराष्ट्रभर मेंढपाळ आर्मीच्या वतीने व पशुसंवर्धन विभागाच्या सहकार्याने वाड्यावर जाऊन शेळ्या मेंढ्यांचे लसीकरण व प्रबोधन राबवणार असल्याचे सांगितले यावेळी संघटनेचे सचिव राहुल हजारे,सुधाकर गावडे, राजु ढाळे,पोपट भिसे,प्रताप एडके, महेश थोरात, सतीश वाघमोडे,धनाजी पांढरे,उत्तम जानकर महादेव गावडे, ऍड. विनायकराव पाटील यांनी मार्गदर्शन केले या लसीकरण व शिबिराचा लाभ तासगाव येथील अनेक मेंढपाळ बांधवांनी घेतला तसेच या कार्यक्रमासाठी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
