शेतीच्या पाण्यासाठी बिरणवाडी फाटा येथे शेतकऱ्यांचा रस्ता रोको
पोलीस व आंदोलनकर्ते यांच्यात वादावादी, सावळज गाव कडकडीत बंद.
युवा नेते मा.रोहित दादा पाटील यांचा तासगाव पोलीस स्टेशन मध्ये ठिया .
संपादक : संतोष एडके
सावळज – ताकारी सिंचन योजनेच्या पुनदी सिंचन योजनेतून सावळज व परिसराला शेतीसाठी नियमित पाणीपुरवठा व्हावा व नियमित पाणी मिळावे या मुख्य मागणीसाठी सावळज व परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने बिरणवाडी फाटा येथे आज रस्ता रोको आंदोलन केले.

यावेळी आंदोलनकर्ते शेतकरी व तासगाव पोलिसांच्यात वादावादी झाल्याची दिसून येते.

तासगाव पोलिसांनी आंदोलनकर्त्यांचे आंदोलन मोडून पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना तासगाव पोलीस स्टेशन मध्ये कारवाईसाठी घेऊन आल्याच्या निषेधार्थ सावळज गाव कडकडीत बंद ठेवण्यात आले.

युवा नेते रोहित पाटील यांचा पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या –

युवा नेते रोहित पाटील यांचा पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या –
पोलीस जर आंदोलनकर्ते शेतकऱ्यांच्या वरती गुन्हे दाखल करणार असतील शेतकऱ्यांच्या वरती कायदेशीर कारवाई करणार असतील तर माझ्यावरही कारवाई करा यासाठी रोहित पाटील हे आंदोलनकर्ते शेतकऱ्यांसह तासगाव पोलीस स्टेशनमध्ये बसून होते.