सांगली येथील” त्या ” घटनेनंतर तासगाव तालुक्यातील भाजप व राष्ट्रवादी ( शरदचंद्रजी पवार गट ) स्वतंत्रपणे ऍक्टिव्ह मोडमध्ये
संपादक :- संतोष एडके
सांगली येथील एका कॅफेमध्ये अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आला या घटनेचे जिल्हाभर तीव्र पडसाद उमटत असून या घटनेची खबरदारी म्हणून तासगाव तालुक्यातील प्रमुख राजकीय पक्ष भाजप व राष्ट्रवादी ( शरदचंद्रजी पवार गट ) या दोन्ही पक्षाच्या वतीने पण स्वतंत्रपणे कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावर गांभीर्याने दखल घेऊन दोन्ही पक्षांनी तासगाव पोलिसांना स्वतंत्रपणे निवेदन देऊन तासगाव तालुक्यातील अवैद्य धंदे , तासगाव शहरांमध्ये चालू असणारे बेकायदेशीर कॅफे तात्काळ बंद करावेत त्याचबरोबर तालुक्यातील सर्वच प्रकारच्या अवैध धंद्यांना लगाम घालावा या मागणीचे दोन्ही पक्षाकडून स्वतंत्रपणे निवेदन तासगाव पोलिसांना देण्यात आले.
भाजपकडून युवा नेते प्रभाकर पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांसह तासगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री सोमनाथ वाघ यांची भेट घेऊन तासगाव तालुक्यामध्ये अवैद्य व्यवसाय करणाऱ्या वर तसेच तालुक्यामध्ये दहशत माजवणाऱ्या फाळकूट दादा वर कडक कारवाई करावी, त्याचप्रमाणे तासगाव तालुक्यातील हॉटेल्स, कॅफे चालक यांची बैठक घेऊन बेकायदेशीर अवैद्य धंदे चालणार नाहीत अशा सक्त सूचना द्याव्यात त्याचप्रमाणे कोणत्याही राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असेल व तो कायद्याचे पालन करत नसेल तर त्याच्यावरही कडक कायदेशीर कारवाई करावी यासह तासगाव तालुक्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत प्रभाकर पाटील व पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्यात चर्चा झाली.
त्याचप्रमाणे राष्ट्रवादी ( शरदचंद्रजी पवार गट ) तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या वतीने तासगाव तालुक्यातील गावागावात राजरोसपणे अवैद्य धंदे सुरू आहेत. या अवैध धंद्यांचा तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना भयानक त्रास होत असून येणाऱ्या दोन दिवसांमध्ये तासगाव तालुक्यातील सर्वच प्रकारचे अवैद्य धंदे बंद करावेत.अवैद्य धंदे बंद न केल्यास दिनांक 28 मे रोजी राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने दिला आहे याबाबतचे निवेदन तासगाव पोलिसांना देण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्रजी पवार गट) पक्षाच्या वतीने यावेळी तालुकाध्यक्ष विश्वास तात्या पाटील, शहराध्यक्ष ॲडव्होकेट गजानन खुजट, ताजुद्दीन तांबोळी, जिल्हा परिषद सदस्य श्री सतीश पवार,माजी जिल्हा परिषद सदस्य श्री सागर पाटील, माजी नगराध्यक्ष श्री अमोल शिंदे, स्वप्निल जाधव, खंडू पवार, यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
