वासुंबे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी सौ शुभांगी ताई एडके यांची निवड
संपादक – संतोष एडके
वासुंबे ( तासगाव ) येथील वासुंबे ग्रामपंचायत मध्ये सध्या आबा गटाची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ( शरद चंद्र पवार गट) यांची ज्येष्ठ नेते श्री बाळासाहेब एडके नाना यांच्या नेतृत्वाखाली एक हाती सत्ता असून तत्कालीन उपसरपंच सौ नेहा ताई हक्के यांनी गावातील पार्टीच्या ध्येय धोरणा नुसार आपला उपसरपंच पदाचा कार्यकाल संपल्यानंतर दिनांक सहा मे रोजी उपसरपंच पदाचा राजीनामा दिला होता. उपसरपंचांच्या रिक्त जागेवरती वासुंबे ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्या सौ शुभांगी ताई एडके यांची गावातील पार्टीच्या ध्येय धोरणानुसार आज बिनविरोध उपसरपंच पदी निवड करण्यात आली.


यावेळी नूतन उपसरपंच सौ शुभांगी ताई एडके यांनी उपसरपंच पदी आपली निवड झाल्याबद्दल पार्टीच्या सर्वच ज्येष्ठ लोकांचे, कार्यकर्त्यांचे, माता-भगिनींचे आभार मानले आपल्या उपसरपंच पदाच्या कालावधीमध्ये सरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्यांना व ग्रामस्थांना सोबत घेऊन विश्वासाने वासुंबे गावाचा सर्वांगीण विकास करू व शासनाच्या विविध योजना गावातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवून उपसरपंच पदाच्या पदाला न्याय दिला जाईल असे मनोगत व्यक्त केले.
आजच्या या उपसरपंच निवडीच्या वेळी माजी पंचायत समिती सभापती सौ मायाताई बाळासाहेब एडके यांच्यासह वासुंबे ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच श्री जयंत पाटील व ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, सदस्या , ग्रामविकास अधिकारी, कर्मचारी वर्ग यांच्यासह ग्रामस्थ माता-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.