येरळा काठ पडला कोरडा ! तालुका प्रशासनानं घेतलं झोपेचं सोंग, तुरची च्या सरपंचांना गावच्या पाण्यासाठी अर्ध नग्न होऊन आंदोलन करण्याची आली वेळ.
संपादक : – संतोष एडके
येरळा नदी काठावरती असणारे तासगाव तालुक्यातील बोरगाव, राजापूर, तुरची, ढवळी, बेंद्री या गावांच्या शेजारून तर काही गावांच्या मधून येरळा नदी वाहते. सध्या नदीमध्ये पाणीच नसल्यामुळे नदीपात्र कोरडे पडले आहे परिणामी पिण्याच्या पाण्याबरोबरच बागायती शेती व जनावरांच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना प्रचंड वणवण करावी लागत आहे. येरळा नदी काठावरील सर्वच गावांमध्ये भीषण पाणीटंचाई जाणवत आहे भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार व त्यावर ती काहीतरी उपाययोजना शासनाकडून व्हावी या हेतूने जिल्हा परिषद सदस्य श्री संजय दादा पाटील, यांच्या सह तुरचीचे सरपंच श्री विकास डावरे यांनी पुढाकार घेऊन येरळा नदी काठावरील सर्वच गावातील लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांना घेऊन गेल्या एक, दीड महिन्यापासून तासगाव तहसीलदार तासगाव, यांना. येरळा नदीला पाणी सोडण्याबाबत, व पाणी टंचाई दूर करण्याबाबत दोन वेळा निवेदन दिल्याचे सांगण्यात येते.
त्याचबरोबर आरफळ कॅनॉलचे करवडी,कराड ऑफिस ला एक वेळ निवेदन देऊन पाणीटंचाई दूर करण्याबाबत विनंती केली होती.
निवेदने देऊन सुमारे दीड ते दोन महिने होऊन सुद्धा तहसीलदार तासगाव व आरफळ कॅनॉलचे संबंधित अधिकारी यांनी लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप तुरची चे सरपंच विकास डावरे यांनी केला आहे. पाणीटंचाईमुळे येरळा नदी काठावरील सर्वच गावांमध्ये पिण्याच्या पाण्याबरोबरच, द्राक्ष बाग शेती, बागायत शेती,ऊस पट्टा धोक्यात आला आहे. तर पाण्या – चारा अभावी बळीराजाच्या दावणीवरील पशुधन कवडीमोल दराने विकण्याची वेळ शेतकऱ्यांच्या वरती आली आहे.
सध्या तुरची गावामध्ये ग्रामस्थांना प्रचंड पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे पिण्याच्या पाण्याबरोबरच, जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुद्धा गंभीर बनला आहे, बागायत शेती धोक्यात आली आहे. प्रशासनाला वारंवार निवेदन देऊन सुद्धा तालुका प्रशासनाने व आरफळ कॅनॉलचे करवडी कराड,येथील संबंधित अधिकाऱ्यांनी कोणतीच दखल न घेतल्यामुळे तुरचीचे सरपंच श्री विकास डवरे यांनी तुरची गावाला पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतीसाठी पाणी मिळावे यासाठी ढिसाळ प्रशासन व्यवस्थेचा अर्ध नग्न होऊन आंदोलन करून निषेध व्यक्त केला .
आंदोलनामध्ये तुरचीचे सरपंच विकास डावरे यांनी आरोप केला आहे की गावामध्ये सकाळी प्रातःविधीसाठी, आंघोळीसाठी गरजेपुरते पाणी मिळत नाही, सरपंच विकास डावरे यांनी अर्ध नग्न आंदोलन तुरची येथे केली होते सदर आंदोलनाचा व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला आहे.
सरपंच विकास डावरे यांनी अर्ध लग्न होऊन केलेल्या आंदोलनाची दखल घेऊन जिल्हा प्रशासनासह तालुका प्रशासन दखल घेणार का? तात्काळ येरळा नदीमध्ये पाणी सोडणार का ? येरळा नदी काठावरील सर्वच गावातील नागरिकासह,शेतकऱ्यांची पाण्याची तहान भागवणार का ? तसेच तालुक्यातील जबाबदार लोकप्रतिनिधी या ज्वलंत प्रश्नाकडे गांभीर्याने पाहणार का ? याकडे तुरची सह तालुक्यातील जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.
