सांगली लोकसभेचे उमेदवार विकासाची ब्ल्यू प्रिंट सादर करणार का फक्त आणि फक्त एकमेकाची उनी धुनीच काढणार ?
सुज्ञ मतदारांना भावी खासदारांच्या कडून जिल्ह्याच्या विकासाच्या बाबतीत अनेक अपेक्षा.
सु-शिक्षित मतदारांच्या मध्ये गोंधळाचे वातावरण
सध्या सांगली सह देशामध्ये लोकसभे च्या निवडणुकीची प्रचाराची तयारी किंबहुना प्रचार यंत्रणा जोरात चालू असून प्रत्यक्ष भेटीगाठी, डिजिटल माध्यमांच्या मधून प्रचार यंत्रणा त्याचबरोबर वेगवेगळ्या माध्यमातून उमेदवाराचा राजकीय पक्ष, स्वतः उमेदवार कशा पद्धतीने चांगला आहे उमेदवारास निवडून आणणं का गरजेचा आहे हे सर्वच राजकीय मंडळी आपापल्या परीने मतदारांना आकर्षित, करण्याचा प्रयत्न करत असतात.
सध्या सांगली जिल्ह्यामध्ये लोकसभचे तिसऱ्या टप्प्यात होणारे मतदान दिनांक सात मे ला असून जिल्ह्यामध्ये शहरासह ग्रामीण भागात प्रत्येक उमेदवार स्वतःसह आपापल्या प्रतिनिधींच्या मार्फत, राजकीय राज्यपातळी सह देशपातळीवरील नेत्यांच्या उपस्थितीमध्ये सभा मोठ्या प्रमाणात घेत आहेत. सध्या सांगली जिल्ह्यामध्ये जवळजवळ सर्वच गावांच्या मध्ये सध्या प्रचाराची यंत्रणा जोरात चालू असून काही सुज्ञ सुशिक्षित मतदारांच्या मते आज अखेर कोणत्याच उमेदवाराने जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने किंबहुना जिल्ह्याची बेरोजगारी हटवण्याच्या दृष्टीने, जिल्हा कायमचा दुष्काळ मुक्त करण्याच्या दृष्टीने लोकांच्या नजरेला पडेल अशा पद्धतीची विकासाची ब्ल्यू प्रिंट अद्याप कोणीच जनतेसमोर खुले आम सादर केलेली दिसत नाही.
सांगली जिल्ह्यातील सर्वच लोकसभेचे उमेदवार फक्त आणि फक्त एकमेकाचे दोष काढण्यात , एकमेकांची मापे काढण्यात गुंग असून सुज्ञ सुशिक्षित मतदारांच्या मते कोणत्याच उमेदवारास जिल्ह्याच्या विकासासाठी काहीच घेणे देणे नसून फक्त आजच्या घडीला मी कसा निवडून येईल हेच प्रचार यंत्रणेत ठासून जाहीर करताना दिसून येत आहे परिणामी जिल्ह्यामध्ये सुशिक्षित तरुणांची फळी मोठ्या प्रमाणात असून त्यांना कोणत्याच राजकीय पक्षाशी काहीही देणे घेणे नाही त्यांची फक्त एकच मापक व रास्त मागणी सांगली जिल्ह्याच्या विकासाशी निगडित आहे आणि ती मागणी कोणीच आपल्या प्रचार यंत्रणेत ठळकपणांनी सांगताना दिसून येत नाहीत.
सध्या लोकसभेची चुरस पाहता निवडून येण्यासाठी जिल्ह्यात तरुण मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात असून तीच निर्णयांक ठरू शकते या तरुण सुशिक्षित मतदारांच्या मागणीकडे जिल्ह्यातील भावी खासदार लक्ष देणार का.