Blog

विशाल पाटील भिडणार की ऑफर स्वीकारणार

Rate this post

विधान परिषद सदस्यत्व अथवा राज्यसभा सदस्यत्व या ऑफर यावरती बंड थंड होणार की बंडखोरी करणार.

अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस जिल्हाभर चर्चेंना उदान

संतोष एडके तासगाव प्रतिनिधी

सांगली येथील लोकसभेचे उमेदवार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष, वसंतदादा कारखान्याचे चेअरमन, स्वर्गीय वसंतदादा पाटील यांचे नातू मा.विशाल दादा पाटील यांच्या उमेदवारीवरून महाविकास आघाडीमध्ये तणावपूर्वक गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून शिवसेनेचे ( उ बा ठा ) चे पक्षप्रमुख मा. उद्धवजी ठाकरे यांनी त्यांच्या पक्षामार्फत सांगली लोकसभेसाठी डबल महाराष्ट्र हिंदकेसरी पैलवान श्री चंद्रावर पाटील यांना अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केले. महागाडीतील घटक पक्ष राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ( शरदचंद्रजी पवार गट ) यांना कोणत्याही प्रकारे विश्वासात न घेता एकतर्फी उमेदवारीची घोषणा केली. उद्धवजी ठाकरे यांच्या घोषणेपासून ते आज अखेर पर्यंत महाआघाडीत सांगली लोकसभेच्या उमेदवारी पासून प्रचंड तणाव समज – गैरसमज वाढतच चालले आहेत.

आज उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी सांगली लोकसभेचे उमेदवार विशाल दादा पाटील, व विशाल दादा पाटील यांना सुरुवातीपासून उमेदवारीसाठी प्रयत्नशील असणारे ,काँग्रेसचे आमदार माजी मंत्री विश्वजीत कदम या दोघांच्या वरती महाआघाडीतून विशेषतः काँग्रेस पक्षाकडून विशाल पाटील यांना उमेदवारी माघारी घेण्यासाठी प्रचंड प्रमाणात दबाव येत असल्याची चर्चा आहे तर काही जाणकारांच्या मते विशाल दादा पाटील यांना विधान परिषद सदस्यत्व अथवा राज्यसभा सदस्यत्व याची ऑफर वरिष्ठांच्या कडून दिलेची संपूर्ण सांगली जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्र मध्ये जोरदार होत आहे चर्चेप्रमाणे विशाल दादा पाटील ऑफरचा स्वीकार करून महाआघाडीला साथ देऊन आपले बंड ठंड करणार की मशाली ला पाठिंबा देणार अथवा बंडखोर अपक्ष उमेदवार म्हणून भिडणार याकडेच सांगली जिल्ह्यात सह पश्चिम महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!