तासगाव येथे उन्हाळी मैदानी अथलेटिक्स क्रीडा प्रशिक्षणाचे आयोजन.
तासगाव क्रीडा संकुल तासगाव व स्वराज्य स्पोर्ट्स फाउंडेशन तासगाव यांच्या संयुक्त विद्यमाने परिसरातील खेळाडूंसाठी आयोजन.
संपादक= संतोष एडके
क्रीडा संकुल तासगाव येथे वयोगट 8 वर्ष ते 20 वर्ष मुले व मुली यांच्यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्र, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सांगली तथा तालुका क्रीडा संकुल तासगाव व स्वराज्य स्पोर्ट्स फाउंडेशन तासगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित उन्हाळी मैदानी ॲथलेटिक्स क्रीडा प्रशिक्षण शिबिर सन 2024 हे तालुका क्रीडा संकुल, तासगाव या ठिकाणी दिनांक 16 एप्रिल ते 25 एप्रिल 2024 या कालावधीत आयोजित केले आहे तरी अथलेटिक्स या खेळातील जिल्हास्तर, विभाग स्तर, राज्यस्तर व राष्ट्रीय स्तरावर प्राविण्य पात्र खेळाडूंनी शिबिरामध्ये सहभागी होण्यासाठी जिल्हा क्रीडा संकुल, सांगली येथे क्रीडा मार्गदर्शक श्रीमती सीमा पाटील यांच्याकडे व तालुका क्रीडा संकुल तासगाव येथे स्वराज्य स्पोर्ट्स फाउंडेशनचे अध्यक्ष श्री किरण माने सर यांच्याकडे फॉर्म भरून नोंदणी करावी. फॉर्म नोंदणीकरण्यासाठी दिनांक 8 एप्रिल ते 14 एप्रिल 2024 ही अंतिम मुदत असणार आहे.

गेले कित्येक वर्ष स्वराज्य फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष श्री किरण माने सर यांच्या वतीने तासगाव शहरासह परिसरातील खेळाडूंच्यासाठी उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण, कबड्डी स्पर्धा, ॲथलेटिक्स स्पर्धा राबवत असतात. स्वराज्य फाउंडेशन यांनी तालुक्यातील अनेक खेळाडूंना प्रशिक्षण देऊन खेळाडू राष्ट्रीय पातळी पर्यंत घडविले आहेत.
वरील उन्हाळी शिबिराचा खेळाडूंनी लाभ घ्यावा असे आव्हान श्री किरण माने यांनी केले आहे