तासगाव तालुक्यामध्ये “इलेक्शन ड्युटीचा ” काही काम चुकार सरकारी कर्मचारी करतात बाऊ ! दैनंदिन कामकाजास होते चालढकल.
तालुक्यातील सरकारी कार्यालयामध्ये इलेक्शन ड्युटी च्या नावाखाली जाणीवपूर्वक कामे करण्यात टाळाटाळ
जिल्हाधिकारी साहेब लक्ष घालणार का ?
संपादक – संतोष एडके
सध्या देशभरामध्ये लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. आदर्श आचारसंहिता लागू झाली. केंद्रीय निवडणूक आयोगाने निर्देश दिलेल्या पद्धतीने जिल्ह्यातील जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या अधिपत्याखाली लोकसभा निवडणूक कामी वेगवेगळ्या सरकारी कार्यालया मधील अधिकारी, कर्मचारी यांची नेमणूक केली जाते. संबंधित अधिकारी,कर्मचारी यांना निवडनुकीसाठी लागणारे सर्वच प्रकारची माहिती, ट्रेनिंग, दिले जाते.
हा झाला नियमित निवडणूक कामकाजाचा भाग परंतु सरकारी कार्यालयामध्ये कार्यालयीन कामासाठी येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना तासगाव तालुक्यामधील काही सरकारी कार्यालयामधील काही कामचुकारक सरकारी कर्मचाऱ्यांनी इलेक्शन ड्युटीच्या “निवडणूक ड्युटीचा “इतका बाऊ केला आहे की निवडणुकीचे काम चालू आहे, बघू नंतर, चार दिवसांनी या, फोन करा पुन्हा चार दिवसांनी चौकशी केली असता संबंधित कर्मचारी पुन्हा ही निवडणुकीचेच निमित्त सांगून दैनंदिन कामांमध्ये जाणीवपूर्वक टाळाटाळ करतात निवडणूक जाहीर झाल्यापासून अशी उत्तरे सर्वसामान्य जनतेला अलीकडे अधिकच्या प्रमाणात ऐकावयास मिळत आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे .
मुळातच सर्वसामान्य नागरिकांना एक प्रश्न असा पडला आहे की निवडणूक लागली आहे हे खर आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या खात्यातील सरकारी कर्मचारी अधिकारी वर्ग काम करतात हेही खर आहे ” निवडणुकीचे काम प्रामाणिकपणे व कर्तव्यदक्षपणे केले पाहिजे याबाबत कोणाचेच दुमत नाही ते सर्वांचे कर्तव्य आहे.पण नेमकं संबंधित कार्यालयातील कोणत्या कर्मचाऱ्यास निवडणूक ड्युटी लागली आहे अथवा निवडणुकीचे काम दिले आहे हे मात्र काही समजत नाही. निवडणुकीचे काम नक्की कोणते कर्मचारी करतात याची माहिती सर्वसामान्य नागरिकांना काहीच कळत नाही याचा पुरेपूर फायदा कामचुकार कर्मचारी घेतात. कामचुकार कर्मचाऱ्यांच्या कडून सध्या इलेक्शन ड्युटी चे काम चालू आहे ” इलेक्शन ड्युटी ” या इलेक्शन ड्युटीचा काम चुकार कर्मचारी,अधिकारी यांनी इतका बाऊ केला आहे की
अगोदरच काम करण्यास उदासीनता त्यातच हे निवडणुकीचे निमित्त बर सर्वसामान्य नागरिकांनी संबंधित कर्मचारी अधिकाऱ्यांना ” इलेक्शन ड्युटी “. कोणत्या कर्मचाऱ्यात लागली आहे, निवडणुकीचे काम रोजच असते का याबाबत अधिक माहिती विचारली असता काही मुजोर अधिकारी, कर्मचारी सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या आवाजात डापारतात. सर्वसामान्य नागरिक अगोदरच वाढत्या उष्णतेमुळे हैराण असून त्यातच काही काम चुकार सरकारी कर्मचाऱ्यांचा आडमुठेपणामुळे सर्वसामान्य नागरिकांना सरकारी कार्यालयामध्ये हेलपाटे मारून मनस्ताप सहन करावा लागत आहे
अलीकडे तासगाव तालुक्यातील काही सरकारी कार्यालयामध्ये वरील प्रकार दिवसेंदिवस वाढत असून अजून निवडणुकीचे कामकाज चार जून पर्यंत चालू राहणार असून नागरिकांच्या या गैरसोईकडे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी सांगली गांभीर्याने लक्ष देणार का, वेगवेगळ्या सरकारी कार्यालया मधील ” नक्की कोणत्या अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांची इलेक्शन ड्युटी” साठी नेमणूक आहे याचा तपशील सर्वच सरकारी ऑफिस मध्ये नागरिकांना पहाता येईल अशा पद्धतीने नियोजन अथवा सोय करावी अशी मागणी तालुक्यातील त्रस्त नागरिकांच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात येत आहे त्याकडे जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालून कामचुकार अधिकारी, कर्मचाऱ्यांना लगाम घालावा. जेणेकरून सर्व सामान्य नागरिकांना व जनतेला बाऊ केलेल्या ” इलेक्शन ड्युटीचा “त्रास होणार नाही.