सांगली काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक, संतप्त कार्यकर्त्यांनी जिल्हा काँग्रेस कमिटी वरील काँग्रेस हा शब्दच टाकला पुसून.
संपादक -संतोष एडके
सध्या देशात लोकसभा निवडणुकीची तयारी देशभरातील राष्ट्रीय पक्षांनी त्याचबरोबर वेगवेगळ्या राज्यातील घटक पक्षांनी राष्ट्रीय पक्षांना पाठिंबा देऊ, काही घटक पक्षांनी आघाडी करून पूर्ण देशभरातील लोकसभेच्या मतदारसंघात उमेदवारी घोषित करण्याचे काम सध्या वेगाने चालू आहे.
सांगली जिल्ह्यामध्ये भाजप तर्फे विद्यमान खासदार श्री संजय काका पाटील यांना अधिकृत उमेदवार घोषित केले आहे, तर राज्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद चंद्र पवार गट ) शिवसेना ( उबाठा) या महाआघाडीतर्फे महाराष्ट्र हिंदकेसरी पैलवान चंद्रहार पाटील यांना शिवसेना ( उबाठा ) गटाने अधिकृत उमेदवार घोषित केले.
सन २०१४ पूर्वी सांगली लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून देशभर ओळखला जात होता. गेली दोन टर्म विद्यमान खासदार संजय काका पाटील यांनी भाजपच्या चिन्हावरती लढून काँग्रेसचा पारंपरिक गड ताब्यात घेतला. किंबहुना उद्ध्वस्त केला.
सद्या जिल्हा काँग्रेस चे गावपातळीपासून ते जिल्हा पातळीवरील नेते आपापसातील हेवे – दावे विसरून एकत्र झाले असून काही करून चालू लोकसभेचे तिकीट हे लोकसभेचे इच्छुक उमेदवार स्वर्गीय वसंतदादा पाटील यांचे नातू श्री विशाल दादा पाटील यांना काँग्रेसच्या चिन्हावरती तिकीट मिळवून लढण्याचा इरादा, चंग सर्वच काँग्रेस कार्यकर्त्यांनी बांधला होता
.
जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते माजी मंत्री विश्वजीत कदम यांनी आपली पूर्ण प्रतिष्ठा पणाला लावली होती, विश्वजीत कदम व विशाल पाटील यांनी दिल्ली दरबारी, काँग्रेसच्या हाय कमांडशी, राज्यातील काँग्रेस व आघाडीच्या प्रमुख नेत्यांना जिल्ह्यातील काँग्रेसचे पोषक वातावरणाची संपूर्ण माहिती देऊन विशाल पाटील हे खात्रीदायक निवडून येऊ शकतात सांगितले होते. काही करून विशाल पाटील यांना महाआघाडी तर्फे उमेदवारी मिळवायची यासाठी प्रयत्नशील होते.
महाआघाडी मध्ये शिवसेना( उबाठा) गटाने घटकपक्ष असणाऱ्या राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद चंद्र पवार गट ) यांना कोणत्याही प्रकारे विश्वासात न घेता शिवसेना( उबाठा) गटाचे पक्षप्रमुख मा. उद्धव ठाकरे यांनी सांगली लोकसभेचे अधिकृत उमेदवार म्हणून पैलवान चंद्रहार पाटील यांना उमेदवार घोषित केले. तेव्हापासून ते आज अखेर अनेक चर्चा, नाराजी, आरोप, प्रत्यारोप दिल्ली वारी हे सर्व प्रयत्न जिल्ह्यातील काँग्रेसचे इच्छुक उमेदवार विशाल पाटील, काँग्रेस नेते विश्वजीत कदम, व जिल्ह्यातील इतर काँग्रेसचे नेते हे करत होते अखेर उमेदवारी घोषित होऊन अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून राष्ट्रीय काँग्रेस तर्फे अर्थातच विशाल पाटील यांना उमेदवारी न मिळाल्याने जिल्ह्यातील काँग्रेसचे स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी काही ठिकाणी आपल्या पदाचा राजीनामा दिला, तर काही ठिकाणी महाआघाडीचे उमेदवार चंद्रावर पाटील यांचा प्रचार कोणत्याही परिस्थितीत करावयाचा नाही असा निरोप महाआघाडीतील प्रमुख नेत्यांना दिला. यामध्ये प्रामुख्याने स्वर्गीय वसंतदादा पाटील घराण्यावरती प्रेम करणारे कार्यकर्ते व काँग्रेस प्रेमी कार्यकर्ते होते.


जिल्ह्यातील स्वाभिमानी काँग्रेसचे कार्यकर्ते आजपर्यंत विशाल दादा पाटील यांना तिकीट मिळेल यासाठी आशावादी होते. परंतु उमेदवारीबाबत कोणताच बदल होत नाही हे जवळजवळ निश्चित झाल्यानंतर व पैलवान चंद्रावर पाटील हेच महाआघाडीचे अधिकृत उमेदवार असणार हे जवळजवळ निश्चित होणार या महाघाडीच्या धोरणाच्या विरोधात, महाआघाडीच्या निर्णयाच्या विरोधात आज जिल्ह्यातील स्वाभिमानी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा व स्वर्गीय वसंत दादा पाटील प्रेमी , दादा घराण्यावरती प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात उद्रेक झाला. संतप्त कार्यकर्त्यांनी सांगली शहरातील जिल्हा काँग्रेस कमिटीच्या च्या नावाचा बोर्डच पुसून टाकला व महाआघाडीचा निषेध केला तसेच कार्यकर्त्यांनी विशाल पाटील यांना अपक्ष लढण्याबाबत सल्ला व आग्रह केला यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या इमारतीसमोर काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बरोबरच रस्त्यावरती येण्या जाणाऱ्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली दिसून येत होती.