वासुंबेचे लोकनियुक्त सरपंच जयंत पाटील यांना समाज रत्न पुरस्काराने सन्मानित.
लोककल्याण न्यूज / संतोष एडके
वासुंबे ( तासगाव ) येथील लोकनियुक्त सरपंच मा जयंत दत्तात्रय पाटील यांना प्रतिष्ठा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांचा राज्यस्तरीय समाज रत्न पुरस्काराने तासगाव येथे सन्मानित करण्यात आले.

गेली नऊ वर्ष अखंडपणे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, कृषी, वैद्यकीय, तंत्रज्ञान या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या विविध क्षेत्रातील मान्यवरांचा राज्यस्तरीय प्रतिष्ठा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.


वासुंबे ता. तासगाव जि. सांगली येथील लोकनियुक्त सरपंच मा. जयंत दत्तात्रय पाटील यांच्या सामाजिक क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल आज नामवंत शिक्षण तज्ञ व कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांच्यासह डॉक्टर रणधीर शिंदे ज्येष्ठ समीक्षक, मराठी विभाग शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, त्याचबरोबर डॉ- प्राचार्य तथा सहसचिव अर्थ माननीय मिलिंद हुजरे – स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर. डॉ. बाबुराव गुरव ,मा. प्रदीप काका माने- , ॲड. कृष्णा पाटील, प्रतिष्ठा फाउंडेशनचे मा तानाजीराव जाधव व प्रतिष्ठा फाउंडेशनचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये समृद्धी मल्टीपर्पज हॉल तासगाव येथे मोठ्या उत्साहात -आनंदी वातावरणात समाजातील वेगवेगळ्या मान्यवरांचा प्रतिष्ठा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.