रोहित आर आर आबा पाटील व सुमनताई आर आर आबा पाटील यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला
लोककल्याण न्यूज / संतोष एडके
तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार रोहित सुमन आर आर आबा पाटील यांनी त्यांच्या अंजनी या गावातील जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्रावर जाऊन रांगेत उभारून मतदान करीत आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यांच्यासोबत माजी आमदार सुमनताई आर आर आबा पाटील उपस्थित होत्या. रोहित आर आर आबा पाटील यांनी सकाळीच आजी भागीरथीआई यांच्यासह कुटुंबातील वडीलधारी मंडळी, गावातील प्रमुख ज्येष्ठ मंडळी यांचे शुभ आशीर्वाद घेऊन, स्वर्गीय आर आर आबा पाटील यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेऊन गावातील जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्रावर रांगेत उपस्थित राहून मतदान केले.

रोहित पाटील यांनी आपला या विधानसभेसाठीच्या निवडणुकीत पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यांच्यासोबत त्याच्या मातोश्री तासगाव कवठेमंकाळच्या माजी आमदार सुमनताई आर आर आबा पाटील यांनी सुद्धा रांगेत उभारून आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी रोहित आर आर आबा पाटील यांनी मतदारांना लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येकाने आज वेळात वेळ काढून मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावे असे आवाहन केले. तसेच तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातील वातावरण आपणास खूप पोषक असून मतदारांच्या व कार्यकर्त्यांच्यात प्रचंड असा उत्साह आहे. या निवडणुकीत आपलाच विजय असेल असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.
