मतदारांच्या हितापेक्षा पैसा महत्त्वाचा वाटणाऱ्यांना जनता त्यांची जागा दाखवेल – रोहित आर आर आबा पाटील यांचा मणेराजूरी येथील प्रचार सभेत विरोधकांच्यावर हल्लाबोल .
लोककल्याण न्यूज / संतोष एडके
कोरोना सारख्या महाभयंकर परिस्थितीमध्ये रुग्णांच्या आरोग्यापेक्षा, मतदारांच्या हितापेक्षा ज्यांनी रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाईकांची पैशासाठी अडवणूक करून बगलबच्यांच्या माध्यमातून केवळ स्वतःची पैशाची तुंबडी भरण्याचं काम केलं अशा आपमतलबी नेत्यांना जनता या निवडणुकीत त्यांची जागा दाखवेल असा चौफेर हल्लाबोल महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे रोहित आर आर आबा पाटील यांनी केला.


विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने आयोजित मणेराजूरी ता .तासगांव येथील प्रचार सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सांगली जिल्ह्याचे खासदार विशाल दादा पाटील उपस्थित होते. रोहित पाटील आपल्या भाषणामध्ये म्हणाले की, मणेराजुरी हे एकमेव गाव असे आहे की ज्यांनी पडत्या काळात आबा गटाला सावरले. त्यामुळे माझ्या भविष्याच्या राजकारणामध्ये मणेराजुरी हा मला आशेचा किरण वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार सुमनताई पाटील यांच्या माध्यमातून मणेराजुरी गावातील तसेच गावालगत वाड्या वस्त्यांवरती रस्ते, पाणीपुरवठा योजना, शिक्षण, आरोग्य तसेच इतर मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. ‘महावीर चक्र विजेते पांडूरंग साळुंखे यांचे जन्मभूमी असलेले हे गाव सर्वांसाठी आदर्शवत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये विकासाच्या बाबतीत मी स्वतः मणेराजुरीसाठी कधीही कमी पडणार नसल्याचे त्यांनी यावेळी ग्वाही दिली.
खासदार विशाल दादा पाटील यांनी आपल्या भाषणामध्ये माजी खासदार संजय काका पाटील यांचे नाव न घेता कडाडून टीका केली. विकास कामाचा आव आणणाऱ्या माजी खासदारांचे दहा वर्षे निष्क्रियतेत गेलेले आहेत. कोणतेही उठावदार काम त्यांना या दहा वर्षात करता आले नाही. केवळ कुरघोडीचे राजकारण करण्यामुळे जिल्हा दहा वर्ष पाठीमागे गेला. स्वतः 34 वर्षे सत्ता भोगणाऱ्यांनी इतरांनी काय केलं हा विचारण्याचा अधिकार नाही. यावेळी स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे सतीश पवार, खंडू पवार, सदाशिव कलढोणे यांचे भाषण झाले. व्यासपीठावर सुरेश भाऊ पाटील, रोहन पाटील, राहुल पाटील, ताजुद्दीन तांबोळी, जिल्हा परिषद सदस्य सतिश पवार, दिलीप जमदाडे, शंकर दादा पाटील, रामभाऊ थोरात, सदाशिव कलढोणे, खंडू पवार, साहेबराव दादा पाटील, हणमंतराव देसाई, विश्वास तात्या पाटील, दिलीप सावंत, रामगोंडा पाटील, दत्ता हावळे,, दिनकरराव पाटील, अलकाताई माने, सुजाता पाटील, सिराज भाई मुजावर, दिगंबर कांबळे, पतंगराव पाटील, पितांबर काका पाटील, नानासाहेब वाघमारे व पुरण मलमे यांच्यासह सर्व पदाधिकारी ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.