Blog

तासगांव नगर परिषदेत माहिती अधिकार कार्यशाळा संपन्न

Rate this post

माजी राष्ट्रपती स्व.डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या दि. १५ ऑक्टोंबर जन्म दिवस वाचन प्रेरणा दिन निमित्त तासगाव नगरपालिकेचा स्तुत्य उपक्रम.

लोककल्याण न्यूज / संतोष एडके

तासगाव येथील नगर परिषदेने अतिभव्य अशा चार मजली नवीन इमारतीचे बांधकाम केले असून या इमारतीचा लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला. त्यानंतर सोमवार पासून नव्या इमारतीमध्ये कार्यालयीन काम काजास सुरुवात करण्यात आली. या नूतन इमारतीमधील माजी राष्ट्रपती स्व.डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या दि. १५ ऑक्टोंबर जन्म दिवस वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून सर्व सोयींनीयुक्त अशा सभागृहात माहिती अधिकार कार्यशाळा या कार्यशाळेत सर्व उपस्थित अधिकारी कर्मचारी यांचे अधिनियमाचे वाचन केले. या कार्यशाळेचे आयोजन प्रशासक तथा मुख्याधिकारी मा. पृथ्वीराज पाटील यांनी केले होते. नवीन सभागृहातील हा पहिलाच कार्यक्रम होता.

नगर परिषदेच्या कर निरीक्षक डॉ. चेतना साळुंखे यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर प्रमुख वक्ते मा. मिलींद सुतार है म्हणाले की, २८ सप्टेंबर २००५ रोजी माहिती अधिकार कायद्यावर तत्कालीन राज्यपाल महोदयांची स्वाक्षरी आली होती. त्यामुळे हा दिवस माहिती अधिकार दिन म्हणून साजरा केला जातो. कोणत्याही कार्यालयातील कामकाजामध्ये पारदर्शकता असावी या उद्देशाने माहिती अधिकार कायदा तयार करण्यात आला. दुर्दैवाने काही जण या कायद्याचा गैरवापर करतात. त्यामुळे या कायद्याकडे सामान्य माणूस स्वच्छ नजरेने बघत नाही. या कायद्याचा समाजाच्या हितासाठी सुद्धा वापर केला जावू शकतो. या कायद्याची अंमलबजावणी करताना कर्मचाऱ्यांनी अर्जदाराशी सौजन्याने वागणे आवश्यक आहे. मिलींद सुतार पुडे असे म्हणाने की माहिती अधिकार कायद्याचे अर्ज कमीत कमी यावेत म्हणून प्रत्येक विभागाने दर महिन्याच्या

सुरुवातीला काही माहिती स्वतःहून प्रसिद्ध करावी. अर्जदाराशी अतिशय अचूक आणि कायद्याशी सुसंगत पत्रव्यवहार करणे आवश्यक असते. आपल्या समोर येणाऱ्या नागरिकाला सौजन्याची वागणूक दिल्यास लोक माहिती अधिकार कायद्याचा वापर कमीत कमी करतील. या कायद्यातील बारकावे आणि स्वतःचे अनुभव त्यांनी सांगितले तसेच या कायद्याविषयी विस्तृत माहिती सांगितली. त्यानंतर कर्मचात्यांच्या प्रश्रांना त्यांनी अतिशय समर्पक उत्तरं दिली.

अध्यक्षस्थानी नूतन कार्यालय अधीक्षक मा. प्रतिभा जाधव होत्या. या कार्यशाळेसाठी सर्व विभागातील कर्मचारी आणि अधिकारी उपस्थित होते. आभार प्रदर्शन सी.एल.टी.सी. अभियंता मा. अश्विन कोकणे यांनी वेले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!