Blog

वाढदिवस आर आर आबांच्या निष्ठावंत कार्यकर्त्याचा…

Rate this post

लोककल्याण न्यूज / संतोष एडके

तासगाव तालुक्याच्या  राजकारणात तासगाव शहराची भूमिका कायमच महत्वपूर्ण राहिलेले आहे. याच शहरात राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री स्व. आर आर (आबा) पाटील यांच्या विचाराला प्रेरित होऊन सन 1989 -90 च्या वेळी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आबांच्या सोबत प्रचार करणारा एक सामान्य कार्यकर्ता म्हणजेच अमोल (नाना )शिंदे. यांच्या कामाची पद्धत तसेच चांगला संघटक आणि त्यांच्यातील सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्याची इच्छाशक्ती बघितल्यावर आर आर (आबा) यांनी त्यांना 1993 साली तासगाव शहर युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष पद दिले.त्या काळात त्यांनी इतक्या प्रचंड ताकतीने काम केले, आबांचे विचार सर्वत्र पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले, त्यांची धडपड बघून आबांनी 1996 च्या तासगाव नगरपालिका निवडणुकीत पहिल्यांदा नगरसेवक पदासाठी उमेदवारी दिली.सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवणारा, प्रत्येक व्यक्तीला आपल्या कुटुंबातील सदस्य मानणारा, हा आपला माणूस आहे,अशी भावना मतदारांच्या मनामध्ये निर्माण झाली. आणि एक युवा आश्वासक चेहरा तसेच त्यावेळीचे सर्वात कमी वयाचे नगरसेवक म्हणून मतदारांनी त्यांना पहिल्यांदा विजयी गुलाल लावून नगरपालिकेत पाठवले. त्यावेळी बांधकाम समितीचे, आरोग्य सभापती,पाणीपुरवठा सभापती,तसेच उपनगराध्यक्ष पद भूषविले.या काळातील त्यांची कार्य पद्धती बघून 2001-02 साली दुसऱ्यांदा आबांनी त्यांना नगरपालिका साठी उमेदवारी दिली.त्यावेळी नगरपालिकेचे तीन वार्ड होते. त्यावेळी फक्त अमोल (नाना) शिंदे यांचा वॉर्ड विजयी झाला. त्यावेळी आबांनी त्यांना विरोधी पक्षनेता म्हणून संधी दिली. एक सक्षम विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी काम केल्यावर आबांनी 2006-07 साली तिसऱ्यांदा नगरसेवक पदासाठी उमेदवारी दिली.कामाच्या जोरावर व जनतेच्या आशीर्वादाने पुन्हा विजयी झाले.2008 दरम्यान आबांनी अमोल(नाना)शिंदे यांना सर्वात कमी वयाचा नगराध्यक्ष म्हणून संधी दिली.2011-12 ला चौथ्यांदा नगरपालिकेत निवडणुकीत उमेदवारी दिली.चार वार्डाचा एक प्रभाग असताना देखील प्रचंड मतांनी नानांचा विजय झाला.चार वेळा नगरसेवक म्हणून त्यांनी नगरपालिकेचे कामकाज केले. एक महत्त्वाची आणि त्यांची उल्लेखनीय कामगिरी म्हणजे 2008 साली ते नगराध्यक्ष होते त्यावेळी त्यांनी तासगावचा श्वास मोकळा करण्यासाठी एक धाडसी निर्णय घेतला.आणि तासगाव शहरातील सिद्धेश्वर चौक, विटा नाका ,चिंचणी नाका, सांगली नाका, कोकणी कॉर्नर या सर्व चौकांचे रुंदीकरण केले. तसेच तासगाव शहरातून बाहेर गेलेला विटा रस्ता, सांगली रस्ता, भिलवडी रस्ता, भिवघाट रस्ता, या रस्त्याचे चौपदरीकरण करून डिव्हायडर मध्ये स्ट्रीटलाईटचे पोल उभा करून तत्कालीन राज्याचे गृहमंत्री व नेते आर आर (आबा) पाटील यांच्या हस्ते उद्घाटन केले. हा सुवर्णक्षण आजही तासगावकरांच्या स्मरणात आहे. 
  आर आर (आबा) पाटील यांच्या आकस्मिक निधनानंतर तालुक्यातील राजकारणात प्रचंड मोठी पोकळी निर्माण झाली होती.आबांचे कुटुंब राजकीय दृष्ट्या संपले जणू अशी एक पेरणी सर्वत्र केली गेली. अनेक जवळचे समजले जाणारे प्रमुख कार्यकर्ते, नेते पक्ष सोडून आबा कुटुंबाची साथ सोडून विरोधी पक्षात गेले.तर काहीजण राजकीय संन्यास घेऊन घरी बसले.पण आपल्या नेत्याच्या जाण्याने त्याचं कुटुंब एकटं पडलं आणि आपण फक्त बघायची भूमिका घेतोय तर तो कार्यकर्ता कसला.आबा असतानाचे असणारे प्रमुख लोक पक्ष सोडून गेले ती सल आबा कुटुंबाच्या मनात बोचत होती.त्यावेळी आबांच्या पत्नी सुमनताई पाटील यांना पोट निवडणुकीत आमदार पदाची संधी मिळाली. आबांच्या पश्चात हा गट राखणं, मजबूत करणं हे मोठं आव्हान आमदार सुमनताई पाटील यांच्यासमोर होते. त्यावेळी सुमनताई पाटील व स्मिता(दीदी) पाटील यांच्यासोबत राहून शहरातील विस्किटलेली घडी बसवण्याचे काम अमोल नानांनी केले. या पाच वर्षात प्रचंड मेहनत घेऊन गट मजबूत केला. पुढे समाजकार्याच्या माध्यमातून आबांचे पुत्र मा. रोहित (दादा) पाटील यांनी सक्रिय सहभाग घेतला.
   आज रोजी अमोल नाना शिंदे हे एक निष्ठावंत, प्रामाणिक, विश्वासू कार्यकर्ता म्हणून सर्वत्र परिचित आहेत. त्यांच्या कामाची पद्धत जशी 1989-90 साली होती, अगदी तशीच आज 2024 साली आहे .स्व आबांच्या विचाराला पायीक राहिल्याने एक ओळख प्राप्त झाल्याची भावना आजही त्यांच्या मनामध्ये आहे. आज ही प्रशासकीय कार्यालयात सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नासाठी फोन केले जातात. त्यावेळी नमस्कार साहेब ,'अमोल शिंदे बोलतोय' ,इतकं म्हटलं तरी काम होतात. एवढी बांधलकी  प्रशासकीय अधिकारी यांच्यासोबत ठेवलेली आहे. आज आबांच्या पश्चात आमदार सुमनताई पाटील, मा. रोहित (दादा )पाटील यांच्यावर निष्ठा ठेवून समाजकार्य करीत आहेत. एक निष्ठावंत,निष्कलंक, चारित्र्यवान,अभ्यासू ,प्रत्येकाला आपलासा वाटणारा, आपला कामाचा माणूस, अशी ओळख झालेले तासगाव चे मा. नगराध्यक्ष मा.अमोल (नाना) शिंदे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा...!

विकास मस्के
सदस्य ,ग्रामपंचायत वासुंबे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!