वासुंबे ग्रामपंचायतीची कचरा संकलनासाठी नवीन घंटागाडी ग्रामस्थांच्या सेवेत दाखल :-
संपादक :- संतोष एडके
वासुंबे ग्रामपंचायतीच्या विस्तारित हद्दीमधील सांगली रोड,दत्त कॉलनी, सरस्वती नगर, आंबेमळा वासुंबे यातील काही ठिकाणी ग्रामपंचायतीचा कचरा गोळा करणारा ट्रॅक्टर रस्त्यांच्या अडचणीमुळे जाऊ शकत नव्हता. परिणामी वरील विस्तारित परिसरामध्ये ग्रामपंचायतीच्या ट्रॅक्टरच्या माध्यमातून कचरा संकलन करण्यास अडचण येत होती. या गैरसोईमुळे बऱ्याच ठिकाणी ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. ही वस्तुस्थिती विचारात घेऊन गावातील सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य,सदस्या यांनी यावरती तोडगा म्हणून नुकतीच कचरा संकलनासाठी नवीन घंटागाडी घेतली होती.त्या घंटा गाडीचे आज प्रत्यक्ष कामकाज चालू झाले. गेले कित्येक वर्ष ज्या ठिकाणी कचरा संकलन केला जात नव्हता त्या ठिकाणी आज प्रत्यक्ष ग्रामस्थांच्या दारात जाऊन नवीन घंटागाडीच्या माध्यमातून कचरा गोळा करण्यास सुरुवात झाली.आजच्या या ग्रामपंचायतीच्या सुत्य उपक्रमाबाबत अनेक नागरिकांनी ग्रामपंचायतीचे आभार मानले व ग्रामपंचायतीच्या कारभाराविषयी समाधान व्यक्त केले.

आजच्या या नूतन गाडीच्या शुभारंभ च्या कार्यक्रमानिमित्त ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, सदस्या, त्याचबरोबर दत्त कॉलनी ११ नंबर गल्लीमधील ग्रामस्थ, माता-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
