वंदूर ( कागल )येथे ‘पवित्र संगोष्ठी’ चे आयोजन
प.पू. परमात्मराज महाराज.
संपादक :- संतोष एडके तासगांव
विविध धार्मिक कार्यक्रम हे जनमनांमध्ये धार्मिक अभिरुची वाढविण्याचे काम करीत असतात. आडी येथील हार्दायन, श्रीदत्त देवस्थान मठात सातत्याने अनेकानेक धार्मिक कार्यक्रम होत आले आहेत. वंदूर (ता. कागल, जि. कोल्हापूर) येथे हॉस्पिटल निर्माण कार्य चालू असलेल्या ठिकाणीही यावर्षी श्रावण मासाच्या निमित्ताने त्यामुळे श्रावण शुक्ल ३ बुधवार दि. ७ ऑगस्ट २०२४ ला वंदूर येथे ‘पवित्र संगोष्ठी’ चे आयोजन केले आहे.
पवित्र संगोष्ठी म्हणजे पवित्र भावनेने भाविकांचे एकत्र येणे.पवित्र संगोष्ठी म्हणजे पवित्र भावनेने आयोजित करण्यात आलेली भाविकांची पवित्रभाववर्धिनी सभा. पवित्र संगोष्ठी म्हणजे पवित्र उद्देशाने ठरविण्यात आलेली भाविकांची एक विशिष्ट आध्यात्मिक बैठक. पवित्र संगोष्ठी म्हणजे पवित्र मंत्रजप, स्तोत्रपठण वगैरे करण्यासाठी असलेली भाविकांची सामूहिक स्थिती.बुधवार दि. ७/८/२०२४ ला बुधवारी सकाळी सव्वा आठ वाजेपासून सव्वा बारा वाजेपर्यंत ” जय परेश सर्वायण” या वैश्विक मंत्राचा जप होईल. भाविक त्यांच्या इच्छेनुसार इतरही मंत्रांचा जप, विविध स्तोत्रपठण इत्यादी करू शकतात. त्याचप्रमाणे त्याच दिवशी सव्वा बारा वाजले पासून महाप्रसादाचे आयोजन केले आहे.
आपापल्या अंतःकरणातील भक्तिभावनेला अत्यंत स्थिर करण्याच्या दृष्टिकोणातून स्थिर योगावर आयोजित केलेल्या या पवित्र संगोष्ठी नामक कार्यक्रमाचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा, ही नम्र विनंती. ‘मत्तिवडे सुळगांव मार्गावर’ वंदूर गांवाच्या हद्दीत असलेल्या हॉस्पिटल निर्माण कार्यस्थळी भाविकांनी
पवित्र संगोष्ठीचा पवित्र लाभ ग्रहण करण्यासाठी अवश्य उपस्थित राहावे, ही पुनश्च विनंती. असे आव्हान हर्दायन, श्री दत्त देवस्थान मठ आडी तालुका निपाणी जिल्हा बेळगाव यांच्यावतीने करण्यात येत आहे.

कार्यक्रमाची व्यवस्था श्री देवीदास महाराज, श्रीराम महाराज, श्री नामदेव महाराज, श्री अमोल महाराज, श्री ज्ञानेश्वर महाराज, श्री चिदानंद महाराज, श्री मारुती महाराज, श्री समाधान महाराज, श्री श्रीधर महाराजकार्यक्रमाची व्यवस्था श्री देवीदास महाराज, श्रीराम महाराज, श्री नामदेव महाराज, श्री अमोल महाराज, श्री ज्ञानेश्वर महाराज, श्री चिदानंद महाराज, श्री मारुती महाराज, श्री समाधान महाराज, श्री श्रीधर महाराज तसेच परिसरातील जेष्ठ मंडळी व युवा मंडळी नियोजित कार्यक्रमात सहभागी होतील असे श्री दत्त देवस्थान मठ आडी ( निपाणी) यांच्या वतीने सांगण्यात आले.