Blog

तासगाव येथे आमसभा संपन्न आमसभेच्या निमित्ताने तासगाव – कवठेमंकाळ मतदार संघाला परिपक्व नेतृत्वाची झलक :-

Rate this post

सोमवारी तासगाव येथील परशुराम मंगल कार्यालयामध्ये तासगाव कवठेमंकाळचे – लोकप्रिय आमदार मा रोहित दादा पाटील यांच्या अध्यक्षतेत खाली व आमसभेचे सचिव गटविकास अधिकारी श्री किशोर माने, तासगावचे तहसीलदार अतुल पाटोळे, तासगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री सुधाकर लेंडवे, तासगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री सोमनाथ वाघ, वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत व तालुक्यातील सर्वच शासकीय कार्यालयाचे विभागप्रमुखासह , नागरिक माता भगिनी यांच्यासह, विविध राजकीय पक्ष संघटनचे कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत शांततेत आमसभा पार पडली.

आमसभेचे सचिव तासगावचे गटविकास अधिकारी मा. माने साहेब यांनी आम सभेच्या उद्दिष्टासह सन २०२४-२५ च्या आढाव्यासह २५-२६ च्या नियोजन प्रास्ताविकामध्ये नमूद केले तदनंतर तालुक्यातील – आरोग्य, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, एमजीपी, दुय्यम निबंधक, कृषी, भूमी अभिलेख, पोलीस तासगाव पोलीस वाहतूक शाखा , राज्य उत्पादन शुल्क, अन्न व औषध प्रशासन, सहाय्यक निबंधक संस्था, सामाजिक वनीकरण, वनविभाग, प्रधानमंत्री सडक योजना, तासगाव नगरपालिका, तहसीलदार तासगाव, या सर्वच विभागाच्या विभाग प्रमुखांनी आपल्या स्वतःच्या परिचयासह आपल्या विभागाचा लेखाजोखा उपस्थित सर्वांच्या समोर मांडला.
सर्वच विभागाच्या विभाग प्रमुखांच्या आढाव्यानंतर उपस्थित माजी जिल्हा परिषद सदस्य, माजी पंचायत समिती सदस्य, आजी-माजी सरपंच , उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य – तासगाव शहरातील माजी नगराध्यक्ष, माजी नगरसेवक, त्याचबरोबर उपस्थित नागरिकांच्या मधून प्रत्येक विभागनिहाय खात्यांच्या अडचणी,समस्यां व सध्याच्या गरजा व तक्रारींचा पाडाच आम सभेचे अध्यक्ष मा. रोहित दादा पाटील यांच्यासमोर प्रकर्षाने बोलून दाखविला , प्रत्येक विभागाशी निगडित सर्वच विभागप्रमुखांच्यावरती प्रश्नांचा नागरिकांनी भडीमार केला.

सर्वच विभागाचे विभागप्रमुख त्यांच्याकडे दाखल झालेल्या प्रश्नांची व आमसभेत नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे अर्थातच माहिती अध्यक्षासह नागरिकांना सर्वच विभाग प्रमुख मुद्देसूद देत होते, तर काही अधिकाऱ्यांच्या उत्तरांच्या वरती नागरिक, आजी-माजी लोकप्रतिनिधी आक्षेप घेताना दिसून येत होते.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या उत्तरामधून प्रश्नकर्त्या नागरिकांचे, लोकप्रतिनिधींचे समाधान न झाल्यास संबंधितास आम सभेचे अध्यक्ष या नात्याने मा आमदार रोहित दादा पाटील स्वतः उत्तरे देत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!