तासगावात जप्त वाहनांच्या साहित्याची चोरी
लोककल्याण न्यूज / संतोष एडके तासगाव.
येथील तहसील कार्यालयाच्या आवारात उभ्या असलेल्या तीन वाहनांच्या बॅटऱ्या व टायरची चोरी करण्यात आली आहे. सुमारे ४२ हजार रुपयांचे साहित्य चोरीस गेले असल्याची फिर्याद निवासी नायब तहसीलदार प्रकाश किसन बुरुंगले (रा. वृंदावन कॉलनी तासगाव) यांनी तासगाव पोलिसात दाखल केली आहे.
तहसील कार्यालयाच्या आवारात वाळूचोरीतील जप्त वाहने (एमएच १० झेड ४३७८, एमएच १२ एयु ५ व
तहसील कार्यालयाच्या आवारातील घटना
एमएच १० ७८०६) उभी केली होती. दि. २९ ऑक्टोबर २४ रोजी ही वाहने ढवळी येथील नदी पात्रातून विना परवाना बेकायदेशीर वाळू वाहतूक करीत असताना गस्ती पथकाने पकडली होती. या वाहनांवर कारवाई करण्याच्या उद्देशाने ती तहसील कार्यालयाच्या आवारात आणली होती.
या गाड्यांची महसूल विभागाच्या पथकाने दि. ३ जानेवारी रोजी पाहणी केली असता तीनही गाड्यांच्या
चाकांचे टायर व बॅटऱ्या असे ४२ हजार रुपयांचे साहित्य अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. याची माहिती तहसीलदार अतुल पाटोळे यांना देण्यात आली.
पाटोळे यांच्या आदेशानुसार तासगाव पोलिसात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तासगाव पोलिस अधिक तपास करीत आहेत.