Blog

वासुंबे येथे नूतन ग्राम सचिवालयाच्या    इमारतीचे भूमिपूजन संपन्न

Rate this post

लोककल्याण न्यूज / संतोष एडके

वासुंबे ता. तासगाव येथील नूतन ग्राम सचिवलयाचे इमारत बांधकाम भूमिपूजन आमदार सुमनताई आर आर पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.


वासुंबे हे गाव तासगाव शहरालगत असल्याने गावाचा विस्तार दिवसेंदिवस वाढत आहे. गेली अनेक वर्ष छोट्याशा इमारतीमध्ये गावचा कारभार सुरू होता. परंतु अलीकडच्या वाढत्या विस्तारामुळे गावातील एकंदरीत विकासाच्या दृष्टीने वाटचाल करत असताना ,गावांमध्ये प्रमुख संस्था असलेली ग्रामपंचायत इमारत सुसज्ज व सर्व सोयी सुविधायुक्त असावी असा मानस गावातील ग्रामस्थांचा होता. सध्या गावातील ग्रामपंचायत वर स्व आर आर (आबा) पाटील गटाची एक हाती सत्ता असल्याने गावातील सरपंच उपसरपंच सर्व सदस्यांनी गेले वर्षभर सातत्याने पाठपुरावा करून नुतून ग्रामसचिवालय लवकरात लवकर कसे उभा करता येईल यासाठी सातत्याने प्रयत्न केले. स्व बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधकाम योजना च्या माध्यमातून 25 लाख व ग्रामपंचायत स्व निधी मधून उर्वरित रक्कम असे नियोजन करून जवळपास 86 लाख रक्कमचे अंदाजपत्रक करण्यात आलेले आहे.त्यामध्ये सरपंच ,उपसरपंच स्वतंत्र खोली, मीटिंग रूम, ग्रामपंचायत अधिकारी रूम, प्रशासकीय कामकाज साठी स्वतंत्र कक्ष ,तलाठी ऑफिस, पोस्ट ऑफिस, कृषी विभाग ,ATM सुविधा, प्रशासकीय कागदपत्रे ठेवण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था ,गेस्ट खोली, असे स्वतंत्र विभाग करण्यात आलेले आहेत. तसेच नियोजित बांधकाम सुरू झाले नंतर निधीच्या बाबतीत वाढीव तरतूद करून हे काम जवळपास 1 कोटी रक्कमेचे करण्याचा मानस सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य यांचा आहे. गावात सर्व सोयी सुविधा युक्त नुतून ग्रामसचिवालय उभा राहत असल्याने गावातील ग्रामस्थांच्यात आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे.ग्रामस्थांकडून ग्रामपंचायत पदाधिकारी यांचे कौतुक केले जात आहे. यावेळी तासगाव चे मा.नगराध्यक्ष अमोल(नाना)शिंदे , राष्ट्रवादी चे तालुकाध्यक्ष मा.विश्वास तात्या पाटील,पंचायत समिती माजी सभापती मा. सौ मायाताई एडके सूतगिरणी चे संचालक मा.एम.बी. पवार सर, वासुंबे गावचे जेष्ठ नेते मा.बाळासाहेब(नाना) एडके, लोकनियुक्त सरपंच मा.जयंत पाटील, उपसरपंच मा. सौ मंजुळा साळे,तंटामुक्ती अध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य मा.उमेश एडके, मा.विकास मस्के, मा.संतोष एडके, त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्या सौ. नेहा हाक्के, सौ. धनश्री चव्हाण, सौ.श्वेता रोकडे, सौ. शुभांगी एडके, मा. सतीश एडके,मा.भाऊसाहेब आवळे, सौ.सारिका चव्हाण, सौ. संगीता पाटील, तसेच ग्रामपंचायत अधिकारी मा.दीपक भंडारे तसेच मा.शीतल हाक्के, मा.रमेश रोकडे, मा.महेश पाटील ,मा.निलेश चव्हाण, मा.कुंडलिक एडके ,मा.संतोष कोळेकर इ.व गावातील ग्रामस्थ ,युवक वर्ग माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!