वासुंबे येथे महाआरोग्य शिबिर संपन्न :- ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
संपादक :- संतोष एडके
युवा नेते मा. रोहित दादा पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त आर आर आबा पाटील युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य व राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्रजी पवार गट ,सिनर्जी हॉस्पिटल सांगली यांच्या संयुक्त उपक्रमाद्वारे तासगाव तालुक्यामध्ये दिनांक ५ जुलैपासून ते १५ ऑगस्ट पर्यंत मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे.
युवा नेते रोहित दादा आर आर पाटील यांच्या संकल्पनेतून पैशापाण्याअभावी मतदार संघातील गरजू रुग्ण उपचाराविना वंचित राहू नये, सर्वांना सुदृढ आरोग्य लाभावे. या दृष्टिकोनातून या आरोग्य शिबिराचे नियोजन केले आहे
बुधवारी वासुंबे तालुका तासगाव येथे महाआरोग्य शिबिर होते या महाआरोग्य शिबिराच्या सुरुवातीस स्वर्गीय आर आर आबा पाटील यांच्या प्रतिमेला विनम्र अभिवादन करून आरोग्य शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. त्याचबरोबर उपस्थित
डॉक्टर्स व त्यांच्या स्टाफचे स्वागत करून , सर्वांना पुष्पगुच्छ देऊन आरोग्य शिबिराची सुरुवात करण्यात आली.

आजच्या या मोफत महाआरोग्य शिबिरास ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवून गरजू रुग्णांनी त्याचबरोबर ग्रामस्थ – माता भगिनींनी आरोग्य तपासणी, नेत्र तपासणीकरून घेतली, तर काहींनी रक्तदाब, रक्त चाचणी द्वारे शरीरातील शुगर, क्रिएटिन लेव्हल, कोलेस्ट्रॉल या मोफत रक्तचाचणीचा लाभ घेतला.



तसेच गावातील साधारणपणे दहा ते बारा रुग्णांची आजच्या आज पुढील उपचारासाठी – ऑपरेशन साठी सिनर्जी हॉस्पिटल, सांगली व सुदर्शन डोळ्यांचे हॉस्पिटल सांगली येथे सोय करून पुढील ऑपरेशन व उपचार चालू ठेवले. आजच्या या शिबिराचा लाभ गरजू रुग्णांनी व सुमारे दोनशे ग्रामस्थांनी घेतला.
आजच्या या महारोग्य शिबिरासाठी सिनर्जी हॉस्पिटल सांगली, सुदर्शन डोळ्याचे हॉस्पिटल सांगली, चिवटे हॉस्पिटल सांगली यांच्या तज्ञ डॉक्टर्स, व स्टाफ नी सहभाग घेऊन वासुंबे गावातील ग्रामस्थांना उत्तम प्रकारे आरोग्य सेवा देऊन रुग्णांच्या शारीरिक तक्रारीचे निरसन करून पुढील उपचाराची योग्य ती माहिती दिली
आजच्या या आरोग्य शिबिरासाठी गावचे लोक नियुक्त सरपंच श्री जयंत पाटील, ग्रामपंचायत सदस्य श्री संतोष एडके, उमेश एडके विकास मस्के, रमेश रोकडे, शितल हाक्के, निलेश चव्हाण, अमर भाऊ पांढरे, कपिल वाघमोडे, पांडुरंग एडके, ग्रामपंचायत सदस्या सौ श्वेता रोकडे, सौ धनश्री चव्हाण, उत्तम बाबा पाटील सुभाष अण्णा खराडे,ग्रामपंचायतचे कर्मचारी, ग्रामस्थ माता-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आजच्या या महाआरोग्य शिबिराच्या आयोजनाने युवा नेते रोहित दादा आर आर पाटील यांच्या ” मानव सेवा हीच ईश्वर सेवा ” याचा प्रत्यय वासुंबे गावात ग्रामस्थांना अनुभवयास मिळाला.