लोककल्याण न्यूज थोड्याच दिवसांमध्ये सर्वसामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ होणार.
संपादक / संतोष एडके.
पत्रकार. व आशीर्वाद स्टील सेंटर चे संचालक, ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत वासुंबे श्री संतोष भाऊ एडके यांनी सर्वसामान्य जनतेच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी किंबहुना समाजातील शेवटच्या घटकाला लोकशाही मार्गाने जीवन जगत असताना, दैनंदिन जीवनामध्ये वाटचाल करीत असताना येणाऱ्या विविध प्रकारच्या अडचणींना न्याय मिळण्यासाठी, त्याचबरोबर सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, कृषी विषयक, दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी ची वास्तव स्वरूप सर्वांना माहीत व्हावे या हेतूने लोककल्याण न्यूज या नावाने मराठी न्युज पोर्टलची निर्मिती केली असून थोड्याच दिवसांमध्ये वाचकांच्या सेवेमध्ये दाखल होत आहे.