“शेतकऱ्याच्या मुलापासून आयपीएस अधिकारी… संघर्ष, जिद्द आणि मेहनतीची थक्क करणारी कहाणी!”
पुणे शहर हे देशातील एक महत्त्वपूर्ण शहर बनत चालले आहे त्यामुळे येथे गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे शहरात बरोबरच पुणे ग्रामीण सुद्धा एक महत्त्वपूर्ण भाग मानला जातो या पुणे ग्रामीणमध्ये पोलिशिंग करणे सुद्धा आव्हानात्मक काम आहे.
सध्या लोहगड येथे घडलेल्या घटनेवरून पुन्हा एकदा पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांचे नाव चर्चेत आले आहे. अवघ्या काही दिवसात त्यांनी या हाय प्रोफाईल घटनेचे इन्वेस्टीगेशन करून उत्तम कामगिरी केली आहे. खरं म्हणजे पंजाब सारख्या राज्यातून अत्यंत गरीब शेतकरी कुटुंबातून येऊन आयपीएस अधिकारी बनणं आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये शहराची कायदा आणि सुव्यवस्था हाताळणे ही जबाबदारी फारच मोठी असते
संदीप सिंह गिल यांची पार्श्वभूमी जाणून घेऊया
गरीब घरात जन्म घेणं हा गुन्हा नसतो, पण गरिबीला शरण जाणं हा पराभव असतो. आणि हेच सिद्ध करून दाखवलं आहे संदीप सिंह गिल यांनी!
पंजाबमधील एका छोट्याशा खेड्यात शेतकरी कुटुंबात जन्म. घरची परिस्थिती बेताची. लहानपणीच वडिलांचे छत्र हरपले. पुढे काय करायचं, आयुष्यात कसं उभं राहायचं याचंही कोणतंही मार्गदर्शन नव्हतं. इंग्रजी भाषेचं ज्ञान नव्हतं, मोठी स्वप्नं पाहण्याची परिस्थिती नव्हती.
पण एक गोष्ट होती… जिद्द!
महाविद्यालयात गेल्यानंतर इंग्रजी येत नसल्यामुळे अनेकदा कमीपणाची भावना वाटली. अनेकांनी हसले, अनेकांनी दुर्लक्ष केले. पण त्यांनी हार मानली नाही. स्वतःवर विश्वास ठेवला. दिवस-रात्र मेहनत केली. इंग्रजी शिकले. इतके शिकले की पुढे ते इंग्रजी विषयाचे प्राध्यापक बनले! सध्या ते महाराष्ट्र केडरचे आयपीएस अधिकारी आहेत
इथेच ते थांबले नाहीत…
मनात अजून एक स्वप्न होतं – देशसेवा करण्याचं! त्यासाठी UPSC च्या कठीण परीक्षेचा मार्ग निवडला. अनेक अडचणी, अनेक अपयश, आर्थिक संकटं आणि मानसिक ताण यांचा सामना करत त्यांनी अभ्यास सुरू ठेवला.
आणि अखेर…
प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी! IPS
आज ते पुणे ग्रामीण पोलीस दलात पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा प्रवास लाखो तरुणांसाठी प्रेरणादायी आहे.
जर इंग्रजी येत नाही म्हणून तुम्ही खचला असाल…
जर घरची परिस्थिती बेताची आहे म्हणून स्वप्नं सोडली असतील… जर अपयशामुळे निराश झाला असाल…
तर संदीप सिंह गिल यांची कहाणी एकदा वाचा!
कारण यश हे श्रीमंती, इंग्रजी किंवा ओळखीवर मिळत नाही… यश मिळतं ते फक्त जिद्द, मेहनत आणि स्वतःवरच्या विश्वासामुळे!
अशा प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाला सलाम!
“परिस्थिती कितीही कठीण असली तरी स्वप्नं मोठी असतील तर यश तुमच्यापर्यंत चालत येतं.”