तासगाव तालुक्यातील नागाव कवठे येथील नागनाथ मंदिर आणि लक्ष्मीमाता मंदिरात चोरी करणाऱ्या टोळीच्या तपासात तासगाव पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणातील तिघांना यापूर्वीच अटक करण्यात आली होती, तर आज या टोळीतील फरार असलेल्या चौथ्या आरोपीलाही पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे.
लोककल्याण न्यूज/ संतोष एडके तासगाव
दिनांक १८ मे २०२६ रोजी रात्री ८:३० ते १९ मे २०२६ रोजी सकाळी ६:०० या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी नागाव कवठे गावातील नागनाथ मंदिर आणि लक्ष्मीमाता मंदिरात प्रवेश केला होता। चोरट्यांनी मंदिरातील देवाच्या अंगावरील चांदीचे दागिने आणि सोन्याची बोरमाळ अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती। याप्रकरणी सुरेश भिमराव पाटील राहणार नागाव – कवठे एकंद यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता।
पोलीस पथकाची धडाकेबाज कामगिरी:
पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी या घटनेची गंभीर दखल घेत तपासाचे आदेश दिले होते। पोलीस निरीक्षक विशाल टकले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार तपासचक्रे फिरवून यापूर्वीच तीन आरोपींना अटक केली होती। तपासादरम्यान आज फरार असलेल्या चौथ्या आरोपीलाही पोलिसांनी शोधून काढले। या टोळीने चोरी केलेला २ लाख ९२ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे।
कारवाईत सहभागी पोलीस पथक:
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक आरती बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी (जत विभाग) सचिन थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विशाल टकले, सपोनि दीपक पाटील आणि स्थानिक पोलीस पथकाने केली। या कारवाईत सायबर पोलीस ठाणे आणि उमदी पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदारांचेही महत्त्वाचे योगदान राहिले आहे
अटकेतील आरोपी:
यापूर्वी अटक केलेले आरोपी:
१. प्रशांत हिम्मत शिंदे (वय ३०, रा. येळावी, ता. तासगाव)
२. अरविंद राजू चव्हाण (वय २१, रा. सांडेवाडी, ता. पलूस)
३. मच्छिंद्र श्रीशैल्य चव्हाण (वय ३०, रा. बेळोंडगी, ता. जत)
आज अटक केलेला आरोपी:
४. अरविंद श्रीशैल चव्हाण (वय २८, रा. बेळोंडगी, ता. जत)
या प्रकरणाचा पुढील तपास तासगाव पोलीस करत आहेत.
