Tuesday, June 16, 2026
Latest:
Blog

तासगाव एम.आय.डी.सी. विकासाला मिळणार अभूतपूर्व गती!

Rate this post

​मुंबईतील उच्चस्तरीय आढावा बैठकीत प्रशासनाचे अनुकूल संकेत; योगेवाडी, मणेराजुरी झोनमधील पायाभूत सुविधा व भूसंपादन प्रक्रियेला वेग देण्याचे आदेश.

मुंबई, २७ मे २०२६:

सांगली जिल्ह्यातील तासगाव एम.आय.डी.सी. औद्योगिक क्षेत्राच्या प्रलंबित आणि महत्त्वपूर्ण विकासाला गती देण्यासाठी मुंबई येथे आज एक अत्यंत उच्चस्तरीय आढावा बैठक संपन्न झाली. महाराष्ट्र शासनाचे उद्योग विभागाचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत तासगावच्या औद्योगिक वाटचालीसंदर्भात अत्यंत ठोस आणि कृतीशील दिशा निश्चित करण्यात आली.

​बैठकीचे मुख्य आकर्षण म्हणजे तासगावचे कार्यतत्पर आमदार मा. रोहित सुमन आर.आर. पाटील यांनी उद्योग क्षेत्राच्या सद्यःस्थितीबाबत केलेले अभ्यासपूर्ण प्रत्यक्ष सादरीकरण (प्रेझेंटेशन) होय. आमदार पाटील यांनी तासगाव औद्योगिक क्षेत्राची भौगोलिक सुसंगतता आणि गुंतवणूकविषयक क्षमता प्रशासनासमोर सविस्तरपणे मांडली. काही नामांकित औद्योगिक कंपन्यांना तासगावमध्ये प्रकल्प सुरू करण्यासाठी जे प्रस्ताव आणि प्रेझेंटेशन्स देण्यात आले आहेत, त्याची संपूर्ण माहिती त्यांनी यावेळी बैठकीत दिली. आमदार पाटील यांच्या या नियोजनबद्ध तयारीची प्रशासनाने विशेष नोंद घेतली असून, प्रधान सचिवांनी संबंधित विभागांना यावर तातडीने पुढील गतिमान कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.

​या वरिष्ठ अधिकाऱ्यांची होती प्रमुख उपस्थिती:

​तासगाव एम.आय.डी.सी.चा प्रश्न मार्गी लावण्यासाठी उद्योग विभाग आणि एम.आय.डी.सी.चे राज्यातील सर्वोच्च अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. यामध्ये:

  • श्री. पी. अनबलगन (मा. प्रधान सचिव, उद्योग)
  • श्री. पी. वेलारासु (मुख्य कार्यकारी अधिकारी – CEO, MIDC मुंबई)
  • श्रीमती वर्षा ठाकूर-घुगे (सह मुख्य कार्यकारी अधिकारी-२, MIDC मुंबई)
  • श्री. आयुब तांबोळी (महाव्यवस्थापक – भूमी)
  • श्री. पुलकंडवार (सह सचिव, उद्योग)
  • श्री. संजय पाटील (मुख्य नियोजक, मुंबई)
  • श्री. आर. के. बनसोड (मुख्य अभियंता, MIDC मुंबई)
  • श्री. राहुल भिंगारे (प्रादेशिक अधिकारी, MIDC सांगली)
  • श्री. सुनील कोलप (कार्यकारी अभियंता, MIDC सांगली)
  • श्री. सुभाष ता. आरगे (सहाय्यक क्षेत्र व्यवस्थापक, MIDC सांगली)
  • श्री. पवन बोबडे (प्रमुख भूमापक, MIDC सांगली) आदींचा समावेश होता.

​बैठकीतील महत्त्वपूर्ण निर्णय आणि धोरणात्मक चर्चा:

  • पायाभूत सुविधांचा विकास: योगेवाडी व मणेराजुरी झोनमधील अंतर्गत पायाभूत सुविधांच्या कामांना तात्काळ मंजुरी देऊन ती गतिमान करणे.
  • भूसंपादन प्रक्रियेला गती: एम.आय.डी.सी.साठी आवश्यक असलेल्या भूसंपादन प्रक्रियेतील त्रुटी दूर करून ही प्रक्रिया वेगाने पूर्ण करणे.
  • भूखंड दराची अधिसूचना: या क्षेत्रातील भूखंडांचे दर निश्चित करणारी अधिकृत अधिसूचना प्रशासनातर्फे लवकरच प्रसिद्ध केली जाईल.
  • गुंतवणूकदारांचे आकर्षण: देशी व आंतरराष्ट्रीय स्तरावरील मोठ्या गुंतवणूकदारांसमोर तासगाव एम.आय.डी.सी.ची बलस्थाने प्रभावीपणे मांडण्यास प्रशासनाने संमती दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!